‘काळोखावरची टोळधाड’ : रस्त्यातील लढ्याला बळ द्यावे, या विचाराने सजग झालेले लोक बाबासाहेबांच्या विचाराचे वाहक म्हणून निर्माण होत आहेत
कवीला ही ‘नाही रें’ची अवस्था दिसत असली तरी तो आशावादी आहे, कारण जंगल आता बेचिराख होऊ लागलेय, विमुक्त आपल्या खांद्यावर पालं घेऊन आपले अस्तित्व मुखर करत आहेत. तो आता जागा झाल्यामुळे ‘आपल्या घामाचा वाटा मागणार आहे/ पुन्हा एकदा चवताळलेला पॅंथर आला आहे’ हा पॅंथर जब्याचे शरीर स्थिरस्थावर करत आहे. तो आता दगड भिरकावतोय मंदिरातल्या मूर्तीच्या रोखाने. जब्या आता जबाब मागतो आहे. ‘माझ्या धनाचा वाटा कुठाय?’ असा प्रश्न विचारतोय.......